
- जळगाव: महाराष्ट्रातील वातावरणीय बदलांच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील गावांमध्ये दुष्काळाची पूर्वतयारी, जलसुरक्षा, वन व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि वातावरण बदलाच्या संकटांचा सामना करण्याची क्षमता बळकट करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ३५ गावांचे प्रतिनिधी व प्रमुख कार्यकर्ते एकत्रित आले होते.
वातावरण बदलासंदर्भातील कृतींमध्ये ग्रामस्थांचे नेतृत्व, त्यांचे अनुभव आणि त्यांचे विचार केंद्रस्थानी ठेवून या परिषदेत चर्चा करण्यात आली यावेळी प्रतिभाताई शिंदे, शेहजो सिंग, असर संस्थेचे संस्थेचे
विश्वजीत पुजारी
प्रवीण मोते
अनिकेत नवलकर
सुहास जोशी आदींनी मार्गदर्शन केले.
परिषदेत झालेल्या कार्यशाळेत वातावरण बदलाची सद्यस्थिती, वैज्ञानिक आधार, वाढते तापमान, दुष्काळ, बदलते ऋतुमान, अवकाळी पावसाची समस्या अशा सततच्या वाढत्या समस्यांचा होणाऱ्या परिणामावर सहभागी लोकांनी प्रकाश टाकला. वातावरण बदलाच्या समस्यांचा आदिवासी समुदायांवर थेट परिणाम वाढत असल्याचे यातून समोर आले. पाण्यासाठी वाढलेली वणवण, वाढत्या तापमानात घरकामांमधील त्रासात झालेली वाढ, वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम अशी अनेक समस्यांची यादीच यावेळी मांडली.
वातावरण बदलाच्या आव्हानावर उपाययोजना, त्रुटी अशा व्यापक विषयावर यामध्ये चर्चा यावेळी केली असून एकत्रितपण यावर काय कृती करता येईल यासाठी वातावरणीय कृती आराखडे कसे तयार केले जाऊ शकतात हे जाणून घेतले.
समाजातील वेगवेगळ्या घटकांचा वातावरण बदलाच्या परिणामांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा भिन्न भिन्न असतो. दुष्काळ, वाढता कर्जबाजारीपणा, पाण्याची कमतरता, अवकाळी तसेच पूरपरिस्थिती याची मांडणी उपस्थित लोकांनी मांडली. गाव पातळीवर वातावरणातील बदल आणि उपजीविका संरक्षण करण्यासाठी वातावरणीय बदल संदर्भ केंद्र तयार करण्याचे ही निश्चित करण्यात आले.
शेवटी सर्व सहभागी लोकांनी वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी शपथ घेण्यात आली.



