Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- लोकमत ‘लोक रत्न’ सन्मानाने मुकेश सोनवणे यांचा गौरव
- देऊळवाडे येथे स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष! विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने
- सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा दिमाखात संपन्न
- प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद तर्फे अवयवदानाचा महासंकल्प!
- जळगाव जिल्हा दूध संघात शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह स्व. जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे लोकार्पण
- वातावरण बदलाला सामोरे जाण्यासाठी जळगावच्या आदिवासी गाव समूहांचा पर्यावरण, शेती व उपजीविका संवर्धन व संरक्षणाचा निर्धार,
- स्वयंरोजगार व उद्योजकता जागरुतीसाठी अमृतमार्फत* *6 ते 18 ऑगस्ट दरम्यान भडगाव येथे प्रशिक्षण*
- महापालिकेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी नगरसेवक प्रशिक्षणाला रवाना
Author: Team Divya Prahar Live
जळगाव : कर्तृत्व, सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेची दखल घेत लोकमततर्फे आयोजित ‘लोकमत सन्मान सोहळा २०२६’ मध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगारांचा ‘लोक रत्न’ सन्मान देऊन गौरव करण्यात आला. जळगाव येथील अंकल हवेली हॉटेलमध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा सरस्वती इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन मुकेश सोनवणे यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. सिनेअभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते मुकेश सोनवणे यांना ‘लोक रत्न’ सन्मान प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातही आपल्या कामाची ओळख निर्माण करत असताना गावातील नागरिकांनी स्वतः देऊळवाडा गावाचा लोकनियुक्त सरपंच पदाचा मान निकिता सोनवणे यांच्या गळ्यात टाकली…
जळगाव च्या देऊळवाडे गावातील मराठी शाळेच्या प्रांगणात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, सरस्वती पूजन, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच निकिता सोनवणे होत्या. गावाचे आदर्श पालक अनिल सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच निकिता सोनवणे तसेच कोळी महासंघाचे अध्यक्ष व माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश सोनवणे यानी सहपत्नी प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बालगोपाल तसेच मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक्स आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. दरम्यान, मराठी…
जळगाव च्या मोहाडी १५ ऑगस्ट निमित्त सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव मोहाडी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीपर वातावरणात दिमाखात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनातून राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, शौर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला. या गौरवपूर्ण सोहळ्यास MCA Academy चे संस्थापक संकेत नेवे सर व मोनिका नेवे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका मालू सापकाळे, उपमुख्याध्यापिका रचना खिलोसिया, समन्वयक व समुपदेशक पुनम चौधरी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात झाली. तिरंग्याला मानवंदना देताना संपूर्ण…
नशिराबाद -“आपल्या मृत्यूनंतरही आपले डोळे कोणालातरी दृष्टी देऊ शकतात, आपले हृदय कोणाच्यातरी शरीरात धडकू शकते. अवयवदान हे केवळ एक दान नसून, ते एका विझणाऱ्या आयुष्याला दिलेले जीवनदान आहे,”* असा भावनिक आणि प्रबोधनात्मक संदेश देत आज प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादच्या वतीने गावात भव्य अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात आली. निमित्त होते जागतिक अवयवदान दिनाचे आणि राज्य शासनाच्या ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचे. सदर रॅलीचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या मोहिमेला सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एकत्र…
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रासह विविध विकासात्मक उपक्रमांचे उद्घाटन उत्साहात पार पडले. दुध संघात साकारलेल्या या प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणार आहे. यावेळी जळगाव जिल्हा दूध संघाचे संस्थापक चेअरमन तथा माजी गृह राज्यमंत्री स्व. जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, दूध संकलन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. दूध संघाच्या आधुनिकीकरणाला आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जळगाव: महाराष्ट्रातील वातावरणीय बदलांच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील गावांमध्ये दुष्काळाची पूर्वतयारी, जलसुरक्षा, वन व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि वातावरण बदलाच्या संकटांचा सामना करण्याची क्षमता बळकट करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ३५ गावांचे प्रतिनिधी व प्रमुख कार्यकर्ते एकत्रित आले होते. वातावरण बदलासंदर्भातील कृतींमध्ये ग्रामस्थांचे नेतृत्व, त्यांचे अनुभव आणि त्यांचे विचार केंद्रस्थानी ठेवून या परिषदेत चर्चा करण्यात आली यावेळी प्रतिभाताई शिंदे, शेहजो सिंग, असर संस्थेचे संस्थेचे विश्वजीत पुजारी प्रवीण मोते अनिकेत नवलकर सुहास जोशी आदींनी मार्गदर्शन केले. परिषदेत झालेल्या कार्यशाळेत वातावरण बदलाची सद्यस्थिती, वैज्ञानिक आधार, वाढते तापमान, दुष्काळ, बदलते ऋतुमान, अवकाळी पावसाची समस्या अशा सततच्या वाढत्या समस्यांचा होणाऱ्या परिणामावर सहभागी लोकांनी प्रकाश टाकला. वातावरण बदलाच्या समस्यांचा…
जळगाव जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगार व उद्योजकतेकडे प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या जिल्हा अमृत संस्थेंमार्फत “अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम” (EDP) प्रशिक्षण बॅचचे आयोजन जिल्ह्यातील भडगाव येथे 6 ते 18 ऑगस्ट 2026 दरम्यान पर्यंत करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाला प्रशिक्षक म्हणून पंकज पाटील (ज.ज.स.बँक लि.जळगाव शाखा भडगाव) बँक व्यवहार संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. अमृतचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे हे अमृतच्या विविध योजना व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत माहिती देणार असून सहकार्य अमृत मित्र किरण शिंपी करणार आहे. या बॅचमध्ये एकूण 15 प्रशिक्षणार्थी सहभागी होणार असून प्रशिक्षणास ऑनलाईन सुरुवात 11 ऑगस्ट 2026 पासून होणार आहे. प्रशिक्षणामध्ये व्यवसाय नियोजन, डिजिटल व्यवहार, उद्योग…
महापालिकेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी नगरसेवक प्रशिक्षणाला रवाना अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे नाशिक येथे आयोजन जळगाव : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी नाशिक येथे शुक्रवार, दि. ७ आणि ८ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नगरसेवकांना महानगरपालिकेच्या कामकाजाची प्रत्यक्ष कार्यपद्धती आणि नियमावलीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. यंदाच्या महापालिकेत नवनिर्वाचित नगरसेवकांची संख्या मोठी आहे. नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळावा आणि महासभेत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे व अभ्यासू वृत्तीने मांडता यावेत, यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी हे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. यापूर्वी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले…
‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद येथे जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून जाहीर पथनाट्य आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील सातीबाजार चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्तनपानाचे महत्त्व पटवून देत महिलांमध्ये व्यापक प्रबोधन करण्यात आले. हा कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या विशेष सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला. *पथनाट्य व समुपदेशनातून दिलेला महत्त्वाचा संदेश:- चिकाचे दूध हीच पहिली लस: बाळाच्या जन्मानंतरचा पहिला तास अत्यंत महत्त्वाचा असतो. मातेचे पहिले पिवळसर चिकाचे दूध हे बाळासाठी ‘इम्युनिटी बुस्टर’ म्हणजेच पहिली…

